आमच्या सौ ने त्याला दहा रुपये देऊन त्याचे करियर कसे होईल? याचा कौल लावायला सांगितला. उजव्या बाजूला फिरला की चांगले होणार डाव्या बाजूला वाईट होणार. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले. तिनेही दगड फिरवून दोन-चार इच्छा चा कौल विचारून घेतला. हे सर्व मी गंमत म्हणून पाहत होतोच. मग मल्हार ला माझ्या मुलाला मी परत दहा रुपये दिले, आणि त्याला सांगितले सूर्य पश्चिमेकडे उगवणार का? हे विचार आणि त्याचा दगड चक्क उजवीकडे फिरला.😃
पाचवीतला मुलगा म्हणाला पप्पा ही किती खोट आहे आणि हे सर्व लोकांना किती फसवत आहेत.
सकाळच्या वेळी कमी गर्दीच्या काळात साधारण एका मिनिटांमध्ये पाच लोक कौल लावत होते. म्हणजे तासाला साधारण तीस. म्हणजे तासाला तीनशे या हिशोबाने काहीही कष्ट न करता दिवसाकाठी साडे तीन-चार हजाराचा गल्ला गोळा केला जात असणार
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें