मंगलवार, 15 सितंबर 2020

काच

काची बाहेरच्या सुंदर जगात असंख्य हात मदतीसाठी पुढे आहेत कोण हासणारे कोण कुरवाळणारे जवळ घेणारे
पण काचे पलीकडे 
श्वासासाठी झगडावे लागणार आहे 
एकट्यालाच

शुक्रवार, 3 जनवरी 2020

मी एक नास्तिक घडवला

सर्व साथींची‌‌‍‌‍‌‌‍, मित्रांची माफी मागून मी एक गोष्ट सांगू इच्छितो. यावेळेस च्या नाताळच्या सुट्टीत मी घरच्या सर्व मंडळींना घेऊन चक्क  देवांच्या यात्रेला गेलो तुळजापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, अशा येथेच भरपेट देवदर्शनाचा कार्यक्रम आखला. कारण एकच होते माझी मिसेस दुर्दैवाने देवभोळी आहे, अजूनही. तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मी निघालो ,दर्शनाच नुसती निमित्त फक्त तिला साथ-संगत.  तुळजापूर मुक्कामी भल्या पहाटे उठून तिने सर्वांना तयार व्हायला लावून देवीच्या देवळात नेले. मनसोक्त दर्शनाचा कार्यक्रम केला, मी बाहेरच बसून होतो. नंतर प्रदक्षिणेच्या मार्गात मागच्या बाजूला जो कौल लावायचा दगड आहे तेथील गर्दी बघून चिरंजीव मल्हार ने विचारले,तेधे काय आहे?
 आमच्या सौ ने त्याला दहा रुपये  देऊन त्याचे करियर कसे होईल? याचा कौल लावायला सांगितला.  उजव्या बाजूला फिरला की चांगले होणार डाव्या बाजूला वाईट होणार. अशा प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले. तिनेही दगड फिरवून दोन-चार इच्छा चा कौल विचारून घेतला. हे सर्व मी गंमत म्हणून पाहत होतोच. मग मल्हार ला माझ्या मुलाला मी परत दहा रुपये दिले, आणि त्याला सांगितले सूर्य पश्चिमेकडे उगवणार का? हे विचार आणि त्याचा दगड चक्क उजवीकडे फिरला.😃
पाचवीतला मुलगा म्हणाला पप्पा ही किती खोट आहे आणि हे सर्व लोकांना किती फसवत आहेत.
                 सकाळच्या वेळी कमी गर्दीच्या काळात साधारण एका मिनिटांमध्ये पाच लोक कौल लावत होते. म्हणजे तासाला साधारण तीस. म्हणजे तासाला तीनशे या हिशोबाने काहीही कष्ट न करता दिवसाकाठी साडे तीन-चार हजाराचा गल्ला गोळा केला जात असणार